Monday, May 23, 2011

Ashtvinayak Map & Route travels information तिरुपती बालाजी, सिमला, कन्याकुमारी, नागाअर्जुन, माउंटअबू , काश्मीर आणि तसेच इतर ग्रुपसहली साठी, कमी खर्चात = श्री. रमेश दळवी (स्वस्तिक ट्रावेल्स ): ९८६९ ५४११३२

Ashtvinayak Map & Route travels information
तिरुपती बालाजी, सिमला, कन्याकुमारी, नागाअर्जुन, माउंटअबू , काश्मीर आणि तसेच इतर ग्रुपसहली साठी, कमी खर्चात = श्री. रमेश दळवी (स्वस्तिक ट्रावेल्स ): ९८६९ ५४११३२

Saturday, February 5, 2011

अष्टविनायक दर्शन नकाशा आणि माहिती पुस्तक

अष्टविनायक दर्शन नकाशा आणि माहिती पुस्तके

 अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देऊळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात स्थित असलेल्या ह्या देऊळांना स्वतंत्र इतिहास आहे.

अष्टविनायक दर्शन नकाशा आणि माहिती पुस्तकेसाठी इथे लिंक वर क्लिक करा 
ashtvinayak, bus, travels, book, map, routes, pustak, nakasha, details, guidance,  अष्टविनायक, दर्शन, नकाशा, माहिती, पुस्तक, website, blog, information, about

महागणपति | रांजणगाव Mahaganapati | Ranjangaon अष्टविनायक दर्शन माहिती


पुणे अहमदनगर मार्गावर, पुणे जिल्ह्यात, शिरूर तालुक्यात रांजणगाव आहे. इथले देवालय पूर्वेकडे तोंड करून उभे आहे. ह्या देवालयाची रचना अशी केलेली आहे की, उत्तरायन अथवा दक्षिणायन याच्या मध्यकालात, सूर्याचे किरण नेमके ह्या देवाच्या मूर्तीवरच पडत असतात.
देवालयातील सभामंडप इंदोरचे सरदार किबे यांनी बांधलेला आहे. पेशव्यांच्या पदरी असलेले सरदार पवार आणि सरदार शिंदे यांनी येथील ओवऱ्या बांधलेल्या आहेत. देवालयाच्या आतीलमूर्तीचा गाभारा आणि बाहेरील गाभारा श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी बांधलेला आहे.
देवालयाटील पूजामूर्तीच्या खाली तळघरात एक लहानशी मूर्ती आहे. तीच खरी श्रीची मूर्ती आणि मूळं मूर्ती. परधर्मीयांच्या हल्ल्याच्या भीतीमुळे, मूळ मूर्ती अशा प्रकारे लपवून ठेवण्यात आल्याचे सांगतात. त्या मूर्तीला दहा सोंडा आणि वीस हात आहेत असे म्हणतात. ती मूर्ती अगदी क्वचित्‌ प्रसंगीच बाहेर काढण्यात येते. या मूर्तीचे ध्यानाला. “महागणपतीचे ध्यान” म्हणतात. “महोत्कट” असे ह्या गणपतीचे नाव आहे. असे सांगतात की अशाच ध्यानाची दुसरी एक मूर्ती, पेशवाईतील प्रसिद्ध कारभारी हरिपंत तात्या फडके यांच्या वंशजाकडे त्यांच्या पुण्याच्या वाड्यात ठेवलेली आहे.
ह्या देवालयाच्या नजीकच अशी एक विहीर आहे की, त्या विहिरीचे पाणी दुष्काळतही कधी आटत नाही.
देवालयातील महागणप्ती हा डाव्या सोंडेचा आहे. देवाने मांडी घातली आहे. मूर्ती मनोहर आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला ऋद्धिसिद्धि ह्या दोघी उभ्या आहेत.
कथा अशी -
श्रीगणपति एकदा प्रसन्न झाला आणि त्याने त्रिपुरासुराला वर दिला. पण त्यामुळे तो असुर मस्त बनला आणि त्याने चहूबाजूला पुंडाई करायला सुरवात केली. देवांचा राजा इंद्र याला ढवलून ती स्वतःच त्या इंद्राच्या सिंहासनावर बसला. कैलासावर बसलेल्या श्रीशंकराला त्याने सळो की पळो करून सोडले. सगळीकडे असुरांचाच वरचष्म. देवांना कुणीच विचारीना जीवन अगदी असह्य होऊन गेले. श्रीशंकराला बरोबर घेऊन सर्व देव श्रीगणपतीला शरण गेले. गणपतीची आराधना करण्यासाठी नारदांनी आठ श्लोकांची गणेशस्तुती देवांना सांगितली. नारदकृत संकटनाशक स्तोत्र ते हेच!
“प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुः कामार्थसिद्धये ॥”
श्रीगणपति प्रसन्न झला. त्याने वर दिला.
देव-दैत्यांचे घनघोर युद्ध झाले.
त्या युद्धात त्रिपुरासुर मारला गेला.
दैत्यसैन्याचा पुरा निःपात झाला.
सर्वत्र आनंदी आनंद झाला.
मणिपूर नावाचे गाव वसविले. तेच आजचे रांजणगाव.
रांजणगावी गणपती । यशद झाला पित्याप्रती ॥
त्रिपुराची करी समाप्ती । शिव ज्याच्या प्रभावे ॥
महाराष्ट्री अष्टविनायक । त्याचे पायी नतमस्तक
होऊनिया ग्रंथलेखक । देशभाषा बोलतो ॥

विघ्नेश्वर | ओझर Vighneshwar | Ozar अष्टविनायक दर्शन माहिती


जुन्नरला जाताना सुमारे चार फर्लांगावर उजव्या बाजूस ओझर गावाकडे जायला फाटा फुटतो. देवस्थानाकडे जयला कुकडी नदी पार करून जावे लागते.
श्री विघ्नेश्वराचे देवालय पूर्व दिशेकडे तोंड करून उभे आहे. देवालय चारही बाजूंनी दगडी तटाने बंदिस्त करून टाकलेले आहे. ह्या दगडी तटावरून चालण्यासाठी पायवाटही आहे.
देवाच्या मूर्तीसमोर दहा फुटी ऐसपैस मंडप आहे. मंडपाच्या दारातून बाहेर पडले की काळ्या पाषाणाला उंदीर आहे. ह्या मंडपाला लागूनच दुसरा ऐसपैस असा सभामंडप आहे. त्यापुढे आणखीन एक दहा फुटाचा सभामंडप आहे. त्याच्यापुढे दगडी फरशीचे विस्तृत पटांगण आहे. ह्या पटांगणात दोन दीपमाळा उभ्या आहेत.
देवळाचा चुमट मोठा कलाकुसरीचा आहे. त्यावर शिखर आणि सोनेरी कळस आहे.
देवालयाचा परिसर फारच रमणीय आहे. देवालयाच्या मंदिरावरील शिखर चिमाजी अप्पांनी बांधले. वसईचा किल्ला जिंकून परत येत असतानाच, चिमाजी अप्पांनीह्या देवालयाचा जीर्णोद्धार करविला.
श्रीमंत बाजीराव पेशवे हे देखील ह या विघ्नेश्वराचे महान भक्त होते. ह्या विघ्नेश्वरासंबंधी जी कथा सांगतात ती अशी -
एकदा इंद्राचा दरबार चालू असताना, तेथे नारदमुनीची स्वारी प्रगट झाली. त्यानी इंद्राला असे निवेदन केली की, “हिमालयावर अभिनंदन नावाच्या राजाने यज्ञसंभारभ मांडला आहे. त्या यज्ञात अभिनंदनाने, तुझा हविर्भाग तुला देऊ केला नाही. आणि अशाप्रकारे त्याने तुझा अपमान केलाआहे. हा असा अपमान तू का सहन करावास?” अपमान झाल्याचे कळताच इंद्र खूप संतापला. काळ नावाच्या राक्षसाला विघ्नासूर असे नाव इंद्राने दिले. आणि त्याच्याकडून त्या राजाच्या यज्ञाला विघ्न आणले. साऱ्या देवांमध्ये घबराट पसरला. सर्व देवांनी श्रीगणपतीची प्रार्थना केली.
श्रीगणपती पार्श्व ऋषींचा पुत्र बनला आणि त्याने विघ्नासुराशी युद्ध आरंभले. त्या युद्धात गणपतीने विघ्नासुराचा पाडाव केला. विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गनपतीने त्याला अभय दिले.आणि त्याच्याच विनंतीवरून गणपतीने, ‘विघ्नेश्वर’ हे नाव धारण केले. देवांनी भाद्रपद शुद्ध ४ ला, ओझरगावी गणपतीची स्थापना केली. तेव्हापासूनच ह्या देवाचे नाव विघ्नेश्वर असे पडले.
ह्या देवालयातील विघ्नेश्वराची मूर्ती पूर्णाकृती आहे. देवाने मांडी घातलेली आहे. सोंड डावीकडे आहे. डोळ्यांत दोन माणके बसविली आहेत. कपाळावर हिरा बसविला आहे. आणि बेंबीत खडा आहे.
ओझरगावी विघ्नेश्वर । जये मारिला विघ्नासूर
तो मी नमिला रूपसुंदर । पिगलाक्ष गजानन ॥

गिरिजत्मज | लेण्याद्री Vighneshwar | Ozar अष्टविनायक दर्शन माहिती


लेण्याद्री हा डोंगर जुन्नरच्या उत्तरेला आहे. ह्या डोंगराजवळ जाण्यासाठी मार्गातील कुकडी नदी पार करून जावे लागते. गावापासून हा डोंगर मैल-दीड मैल अंतरावर आहे.
पावसाळ्यात कुकडी नदी अगदी दुधडी भरून वाहात असते. त्यावेळी डोंगरावरील श्रीगणपतीच्या दर्शनाला जाणे केवळ अशक्यप्राय ठरते.
डोंगरावरील लेणी फारच सुंदर आहेत. ह्या देवालयाच्या सभामंडपाची उंची फार कमी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यापुढील सभामंडप बराच मोठा आहे. त्यात कोरलेले पाषाणाचे सहा खांब असलेले दिसतात. मुख्य गाभारा बराचसा आतल्या बाजूला आहे आणि तेथे बराच अंधार आहे.
ह्याच डोंगरातील एका गुहेमध्ये पार्वतीने तपश्चर्या केली. श्री विनायक तेथे प्रगट झाले तेव्हा तिने तिथे श्री विनायकाची प्रतिष्ठपना केली. परंतु ती जागा अतिशय अवघड अशा जागी आहे. त्यामुळे तेथे जाऊन त्या गणपतीचे दर्शन घेण्याचे काम महाकर्म कठीण ठरते.
असे सांगतात की, इतिहासकाळात एकदा नाना फडणविसांनी त्या बिकट जागेवर असलेल्या गणपतीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना दृष्टांत झाला आणि त्यामुळे तो आपला प्रयत्न त्यांना सोडून द्यावा लागला.
देवालयात गणपतीची स्वतंत्र अशी मूर्ती नाही. परंतु लेण्यातील एका भिंतीवर गणपतीचे बालरूप खोदून ठेवलेले आढळते.
लेण्याद्रि गणपती तो हाच !
ह्या गणपतीसंबंधीची पुराणातली कथा अशी -
देवी पार्वती एकदा लेण्याद्रीच्या गुहेत बसलेली असताना गणपती आपला पुत्र व्हावा असे तिला वाटले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तिने मातीची गणेशमूर्ती तयार केली आणि त्या मातीच्या मूर्तीचे ती चिंतन करू लागली. मग काय ?
मातीची मूर्ती सजीव झाली.
दिव्य तेजस्वी असा तो गणपती तिच्या पुढे आला. परंतु पार्वती आपल्या चिंतनात मग्न झाली होती. त्याने तिला जागे केले. पार्वती धन्य झाली.
गणपतीने तेथेच वास्तव्य केले.
अनेक लीला करून दाखविल्य.
अनेक राक्षसांना गणपतीने नायनाट केला.
पार्वती म्हणजेच गिरिजा.
त्या गिरिजेचा हा आत्मज म्हणून गिरिजात्मज
लेण्याद्रिच्या कडेकपारी । गिरिजात्मज तो वास करी ।
मातेसाठी मिरीकुहरी । पार्थिव देवत्व पावले ॥

चिंतामणि | थेऊर Chintamani | Theur अष्टविनायक दर्शन माहिती


मोटार-थांब्यापासून अवघ्या एका फर्लांगावरच श्रीचिंतामणीचे देवालय आहे. देवालयाचे महाद्वार उत्तराभिमुख आहे. चिंचवडचे मोरया गोसावी यांचे वंशज श्री चिंतामणि देव यांनीच हे देवालय बांधले. त्यानंतर साधारण शंभर एक वर्षांनी, श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी सभामंडप बांधला आणि ह्या देवालयाचा विस्तार केला. नंतर पेशव्यांचे सेनापतीहरिपंत फडके आणखी इतर भक्तमंडळीनी मिळून ह्या देवालयात काही फेरफार करून त्याची भव्यता आणि शोभा अधिक वाढविली.
देवालयाच्या आवाराबाहेर जवळच पेशव्यांचा वाडा होता. परंतु तो वाडा आता तेथे उभा नाही. मुख्य दिंडीदरवाजाचे काही अवशेष मात्र अजूनही शिल्लक आहेत. वाड्याचे आवार बरेच भव्य दिसते. तेथील भव्य अवशेषांवरून त्या वाड्याच्या पूर्वीच्या भव्यतेची कल्पना येते. ह्या वाड्यापासून थेट नदीपर्यंतची फसरबंदी वाट पेशव्यांनी बांधून काढली होती. ही फरसबंदी वाट मात्र अजूनही सुस्थितीत राहिलेली आहे.
थेऊर गावाच्या तिन्ही बाजूला मुळमुठा नदीचा जणू काय वेडा पडलेला आहे. मुळामुठा नदीला अगदी बारमास, उदंड पाणी असते. त्यामुळे थेऊरला पाण्याची कधीच पंचाईत पडत नाही. नदीच्या डोहाला कदंबतीर्थ अथवा चिंतामणि तीर्थ असे नाव आहे.
श्रीचिंतामणि हा डाव्या सोंडेचा गनपती आहे. मांडी घातलेले आसन आहे. मूर्ती अगदी रेखीव आहे. मूर्तीचे तोंड पूर्व दिशेला आहे.
गौतम ऋषीच्या अहिल्येची देवांचा इंद्र यान फसवणूक केली व आपली कामेच्छा पुरी केली. गौतम ऋषींना हीगोष्ट कळताच त्यांनी अहिल्याआणि इंद्र अशा दोघांनाही शाप दिला. अहिल्या शिळा होऊन पडली आणि इंद्राच्या अंगाला क्षते पडली. सर्व देवांना फार दुःख झाले. त्यांनी त्या शापाबद्दल गौतमऋषीची विनवणी केली. गौतम ऋषींनी मग उःशाप दिला. श्रीगजाननाची आराधना केल्याने तुझ्या पापाचे क्षालन होईल असे त्याला सांगितले. बृहस्पतींनी इंद्राला गणेशमंत्र दिला. इंद्राच्या आराधनेमुळे श्रीगजानन प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. त्यामुळे इंद्राचे रूप पालटले आणि तो पुन्हा पूर्ववत दिसू लागला.
हा गणपती, आपल्या मनात चितिलेले देतो म्हणून याचे नाव चिंतामणि असे पडले.
ह्या क्षेत्रासंबंधी दुसरी एक कथा सांगण्यात येते ती अशी -
ब्रह्मदेवाने आपल्या चित्ताला स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून चित्तवृत्तीचा प्रकाशक चिंतामणि याची आराधना केली. चिंतामणि प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर दिला. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या चित्ताला स्थैर्य लाभले. ह्या प्रसंगाचे स्मारक म्हणून हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. येथे साधकांच्या मोहजालाचे निराकरण होते. आणि त्यांना चित्तशांती लाभते.
योगसिद्धीचा लाभ होतो. आणि आत्मसाक्षात्कारही होतो.
याच क्षेत्रात कौडिण्य ऋषींचा आश्रम होता. मोरया गोसावी यांनी सुद्धा येथील अरण्यात उग्र तपश्चर्या केली. याच ठिकाणी त्यांनी त्यांना सिद्धि प्राप्त झाली होती. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची पत्नई रमाबाई ह्यांच्या येथील वास्तव्यामुळे ह्या क्षेत्राला विशेष महत्त्व आले.
पेशव्यांचे दैवत गणपती. परंतु श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यंची ह्या श्री चिंतामणीवर विशेष भक्ति होती. राज्यकारभारातून थोडीशी जरी फुरसत मिळाली तरी विश्रांतीसाठी आणि मनःस्वास्थ्यासाठी, ते थेऊर येथील आपल्या वाड्यात येऊन रहात. ह्या चिंतामणीच्या सान्निध्यात राहूनच त्यांनी आपल्या अंगातील राजयक्ष्मा ह्या रोगाशी सामना दिला. आणि आपले प्राण त्यांनी शेवटी, श्रीचिंतामणीच्याच चरणावर अर्पण केले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई ह्या त्यांच्याबरोबरच सति गेल्या. मुळामुठा नदीच्या काठावर सतीचे वृंदावन आहे. कार्तिक वद्य ८ला दरवर्षी तेथे रमामाधव पुण्यतिथीला उत्सव साजरा केला जातो.
देवालयाच्या एका ओवरीमध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे तैलचित्र लावलेले आढळते.
थेऊरला ह्या श्री चिंतामणीचा उत्सव दरवर्षी, भाद्रपदातल्या चतुर्थीला फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
थेऊर गावी चिंतामणि । देवेंद्रा जो वरदपाणी ।
गौतमाची शापवाणी । ज्याच्या कृपें आटली ॥

वरदविनायक | महड Varadavinayak | Mahad अष्टविनायक दर्शन माहिती


ह्या देवस्थानाविषयी कथा

प्राचीन काळी विदर्भामध्ये कौंडिण्य नावाचे एक शहर होते. तेथे भीष्म नावाचा एक पराक्रमी आणि दानशूर असा राजा राज्य करीत होता. राजा असला तरी तो सुखी नव्हता कारण संततीचे सुख त्याला लाभले नव्हते. त्यामुळे आपल्या गादीला वारस नसणार आणि आपला वंशविस्तार होणार नाही याची त्याला चिंता लागून राहिली होती.
एके दिवशी त्याच विचारामुळे त्याचे डोके भणाणून गेले आणि राज्यकारभार आपल्या प्रधानावर सोपवून तो आपल्या राणीसह अरण्यात निघून गेला. अरण्यात गेल्यावर एकदा त्याची आणि विश्वमित्र ऋषींची गाठभेट झाली. आणि त्यांनी राजाला राज्य सोडून देण्याचे कारण विचारले. तेव्हा राजाने आपणास पुत्रसौख्य नसल्यामुळे आपण हा अरण्यावास पत्करला असे सांगितले. विश्वमित्रांनी राजाला एकाक्षर मंत्राचा जप करण्यचा उपदेश केला.
राजा अरण्यातून माघारी फिरला. राजधानीत परत आल्यावर त्याने दक्षाने बांधलेल्या मंदिरात एकाक्षरी मंत्राचा जप करायला सुरवात केली. उग्र तपश्चर्येमुळे सारे विश्व त्याराजाला श्रीगणेशमय दिसू लागले. श्रीगणेश प्रसन्न झाले, राजाने पुत्रप्राप्तीचा वर मागितला. श्रीगणेशानी ‘तथास्तु’ म्हटले.
यथाकाल भीष्म राजाला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव रुक्मांगदासे ठेवण्याट आले. तो तेजापुंज होता आणि त्याची कांती सोन्यासारखी होती. राजकुमाराला योग्य असे सर्व प्रकारचे शिक्षण त्याला दिले. आणि भिष्माने आपला राज्यकारभार त्याच्यावर सोपवून त्याला एकाक्षरी मंत्राचा उअप करण्याचा उपदेश केला.
राजकुमार रुक्मांगद एकदा शिकारीच्या निमित्ताने अरण्यात गेला. आपल्या नेमबाजीने त्याने बऱ्याच जनांवरांची शिकार केली. जनावरांचा पाठलाग करीत राहिल्यामुळेतो बराचसा थकला. त्याला विश्रांतीची जरुरी होती. म्हणूनच विश्रांतीसाठी जवळच असलेल्या एका ऋषिंच्या आश्रमात तो गेला. मुनी स्नानाला जाण्याच्या गडबडीत होते. त्यांना रुक्मांगदाने नमस्कार केला. त्याला आश्रमात बसावयास सांगून ऋषी आपल्या स्नानाला निघून गेले.
मुनीची पत्नी मुकुंदा ही अतिशय रूपवती अशी होती. तिचे रूपसौंदर्य अनुपम होते. रुक्मांगदाला दमल्यामुळे फार तहान लागली होती. त्याचा घसा कोरडा पडला होता. मुकुंदराजवळ त्याने पाणी मागितले. याचकाला तिने पाणी दिले. परंतु ती रुक्मांगदावर मोहित झाली.
तिला काही सुचेनासे झाले आणि रुक्मांगदाला बोलण्यात गुंतवून, तिने आपली वासना तृप्त करण्याची त्याला विनंती केली. परंतु रुक्मांगद तसे दुराचरण करायला तयार झाला नाही. त्याने तिला साफ साफ नकार दिला. तो वश झाला नाही म्हणून ती बरीच कामविव्हल झाली आणि तिने रुक्मांगदाला शाप दिला की, “तुला कुष्ट रोग होईल.
रुक्मांगद त्या आश्रमातून बाहेर पडताच, त्याच्या सोन्यासारख्या अंगावर कुष्ट रोगाचे पांढरे पट्टे दिसू लागले. त्याला फार दुःख झाले. लोकांना आपण आपले तोंड तरी कसे दाखवावे. याची त्याला लाज वाटू लागली. तो आपल्या राजधानीकडे गेलाच नाही. अरण्यातील एका वटवृक्षाखाली आसन ठोकून तो एकाक्षरी मंत्राचा जप करू लागला. त्या निराश बनलेल्या राजकुमारापुढे नारदमुनी प्रगट झाले. आणि त्याला म्हणाले, “कदंब नगरामध्ये गणपतीचे एक देवालय आहे. चिंतामणी ह्या नावाने तो देव आणि कदंबतीर्थ ह्या नावाने ते तीर्थ प्रसिद्ध आहे. देवालयासमोर एक सरोवर आहे. तेथे जाऊन त्या सरोवरात जर का तू स्नान केलेस तर तुझा कुष्ट रोग साफ बरा होईल. तेव्हा ताबडतोब तेथे जा आणि त्या सरोवरात स्नान कर.
रुक्मांगदाने उपदेश प्रमाण मानला आणि कुष्ठरोगापासून तो मुक्त झाला.
इकडे कामविव्हल झालेली मुकुंदा जवळच एका शिळेवर लवंडली. आणि रुक्मांगदाचे ध्यन करू लागली. ती बेसावध बसली होती. तिचे पती वाचक्नबी मुनी आश्रमात नव्हते. देवांचा राजा इंद्र याच्या ध्यानात ही गोष्ट आली. त्याने रुक्मांगदाचे रूप घेतले आणि मुकुंदाची कामेच्छा पूर्ण केली. ती गरोदर राहिली. आणि त्या संबंधापासून तिला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद.
ऋग्वेदातील मंत्रद्रष्टा असा मुनी तो हाच गृत्समद. अनीति मार्गातून त्याचा जन्म झाला म्हणून याज्ञिक मंडळी नेहमीच त्याचा धिक्कार करीत राहिली. त्याच्या जन्माची ती अजब कहाणी आत्रेय मुनींना अंतर्ज्ञानाने अगदी संपूर्ण माहीत झाली होती.
वांरवार, गृत्समदाच्या वाट्याला अवमान-अपमान येत राहिले.जेव्हा तेव्हा त्याची अवहेलना होऊ लागली. अशाच एका प्रसंगी, तो रागाने अगदी लालबुंद झाला. संतापाने पाय आपटीत तो आपल्या मातेकडे गेला आणि त्याने आपला पिता कोण म्हणून विचारले. ती म्हणाली- “रुक्मांगद”, आपल्या आईचा त्याला अतिशय राग आला आणि त्यान शाप दिला.
“तू अमाप फळे येणारी कंटकी होशील, पण तुझ्या फळांना एकही प्राणी कधी तोंड लावणार नाही.” त्याची आई मुकुंदा ही सुद्धा चिडली आणि तिने त्याला शाप दिला- “तुझ्या पोटी एक राक्षस जन्म घेईल आणि तिन्हीलोकांना तो त्रस्त करील.” इतक्यात आकाशवाणी झाली - “गृत्समद हा इंद्राचा पुत्र आहे.” मुकुंदा बोरीचे झाड झाली. मृत्समद घोर तपश्चर्या करण्यासाठी महडच्या अरण्यात आला.
“गणनां त्यां गणपती” ह्या मंत्राचा त्याने जप केला. श्रीगजानन त्याच्यावर प्रसन्न झाले आणि तो मंत्रद्रष्टा बनला.
महडच्या श्रीवरदविनायकाची मूर्ती, त्या गृत्समदाने स्थापन केली. आणि त्यानेच हे देवालय बांधले अशी समजूत आहे.
देवालय पूर्वाभिमूख आहे. लांबून ते एखाद्या कौलारू घराप्रमाणे दिसते. परंतु आत शिरल्यावर आपल्याला कळून येते की ते कोरलेल्या दगडाचे आहे. कोरीव काम मोठे प्रेक्षणीय आहे. मूर्तीसंबंधी दुसरी एक समजूत अशी आहे की, १६९० साली ही मूर्ती एका गणेशभक्ताला तीथल्या तळ्यात सापडली. त्या भक्तान मूर्तीची स्थापना एका अखंड दगडाच्या कोनाड्यात केली. हल्लीचे देवालय हे १७२५ साली बांधण्यात आले. १८९२ सालापासून ह्या देवालयातील नंदादीप अखंडपणे तेवत आहे. मूर्ती सिंहासनावर विराजमान झालेली आहे. सिंहासनाभोवती दगडी महिरप आहे. दोनहत्तीआणि मध्य देवी आहे. सिंहासनाहून मूर्ती वेगळी आहे. मूर्ती पाषाणाची असून डाव्या सोडेंची आहे. मंदिराच्या घुमटाला सोनेरी रंगाचा कळस आहे. देवाच्या गाभाऱ्यापुढे आठ फुटाचा सौरस सभामंडप आहे. बाहेरचा सभामंडप चाळीस फूट लांब आणि चाळीस फूट रुंद अस ऐसपैस आहे. चौफेर गॅलरीवजा माडीही आहे.
देवस्थानाच्या खर्चासाठी नगदी इनाम आहे. १६९० साली शाहू महराजांनी पहिली सनद दिली. १७३० साली दुसरी सनद देण्यात आली. आणि तिसरी सनद ब्रिटीश अमदानीत देण्यात आली ती १८९४ साली.
महडगावी वरदमूर्ती । करी कामनांची पूर्ति ।
गृत्समदे केली कीर्ती । गणनांत्वा गणपतीम्‌ ॥

बल्लाळेश्वर | पाली Ballaleshwar | Pali अष्टविनायक दर्शन माहिती


श्रीबल्लाळेश्वराचे देऊळ फारच मनोहर आहे. त्याचे तोंड पूर्व दिशेला आहे. त्यामुळे सूर्वोदय होताच सूर्याची कोवळी सोनेरी किरणे बरोबर देवाच्या मूर्तीवर पडतात. त्यावेळी तिथले वातावरण अगदी पवित्र आणि प्रसन्न असे एखाद्या नास्तिकालाही वाटते. मंदिराचे बांधकाम अगदी चिरेबंदी आहे. शिशाचा रस ओतून भिंती अगदी मजबूत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे बांधकाम एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणेच झालेले आहे.
मंदिराचा मुख्य गाभारा पंधरा फूट उंच आहे. तो उंदीर गणपतीकडे पहाणारा आहे. मंदिराबाहेरच्चा सभामंडप चाळीस फूट लांबीचा आणि वीस पूट रुंदीचा आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये नक्षीकाम केलेले अगदी मखर आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला दोन तलाव आहेत. त्यावर घाट बांधलेले आहेत. तलाव सदोदित पाण्याने भरलेले असतात. परंतु तलावातले पाणी मात्र स्वच्छ नाही आणि पिण्याजोगे तर बिलकूल नाही. बाहेरच्या कमानीत एक मोठी थोरली घंटा आहे. ती पाहिल्यावर नाशिकच्या नारोशंकरी घंटेची आठवण होते. ही घंटा चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईचा किल्ला जिंकला त्यावेळी जी लुटालुट झाली, त्यात मिळाली आणि ती मग पेशव्यांनी ह्या देवस्थानाला अर्पण केली असे म्हणतात.
मोरोबा दादा फडणीस यांचे वडील बाबुराव फडणीस यांनी हे देवालय बांधले आणि त्यासाठी नेमणूक करून दिली. त्याचवेळी त्यांनी धर्मशाळा आणि मठही बांधला.
जागृत देवस्थान म्हणून ह्या देवस्थानाची फार ख्याती आहे. जुन्या काळू ह्या देवालानवसाचे आततायी प्रकार केले जात असे म्हणतात. त्या प्रकारापैकी आपली जाभ कापून देवाला अर्पण करण्याचा एक प्रकार होता.
अशी एक घटना १७४४/४५ साली पडल्याची नोंद इतिहासात सापडते. ती खबर केली आणि मंदिराची शुद्धि करून घेतली.
१७५३/५४ साली खुद्द पेशव्यांनी श्रीबल्लाळेश्वरावर अभिषेक केला व अनुष्ठान करविले. ह्याबाबत ऐतिहासिक पेशवे दप्तरात एक नोंद आढळून येते.
गाभाऱ्यात श्रीबल्लाळ विनायकाची मूर्ती आहे. तिची उंची तीन फूट आहे. कपाळाचा भाग खोलगट तर बाकीचा चेहरा स्पष्ट असा आहे. सोंड डावीकडे वळलेली आहे. बेंबीमध्ये आणि डोळ्यांमध्ये दैदिप्यमान हिरे बसविलेले आहेत. देवाची मूर्ती दगडी सिंहासनावर विराजमान झालेली आहे. सिंहासन मूर्तीच्या सभोवती जडविलेले आहे. मूर्तीच्या बेंबीपासूनचा भाग सिंहासनाच्यावर दिसून येतो. देवाच्या जवळ ऋद्धिसिद्धि उभ्या आहेत.
कृपयुगामध्ये पल्लीपूर ह्या नगरात, कल्याणशेट ह्या नावाचा एक व्यापारी रहात असे. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. पोटी मूलबाळ नसल्यमुळे इंदुमतीने श्रीगणपतीची उपासना सुरू केली. काहीकाळाने, तिला दिवस गेले. आणि तिला मुलगा झाला.
त्या आपल्या मुलाचे नाव तिने ‘बल्लाळ’ ठेवले. बल्लाळ लहानाचा मोठा होऊ लागला. परंतु त्याला श्रीगणपतीच्या चिंतनावाचून दुसरे काहीच सूचत नव्हते. रात्रंदिवस तॊ आपल्या देवाचे चिंतन करीत राहिला. त्याच्या संगतीत राहिलेली गावातली मुलेही श्रीगणपतीची उपासना करू लागली. ती मुलेसुद्धा सदोदित गणपतीचे चिंतन करीत राहिली. मग काय? बल्लळाची संगत धरल्यामुळे गावातील मुले बिघडून गेली अशी ओरड सुरू झाली. त्या मुलांच्या पलकांनी बल्लाळच्या पित्याजवळ आपली तक्रार निवेदन केली. कल्याणशेटी आपल्या मुलाला रागे भरला. त्याने बल्लाळच्या पुढ्यातली मूर्ती उथळून टाकली आणि त्याला भरपूर मार दिला. “तू असा वेडेपणा करू नकोस आणि गावातल्या मुलांना बिघडवू नकोस” असाही त्याला दम दिला.
बेदम मार खाल्ल्यामुळे, बल्लाळ बेशुद्ध झाला. श्रीगणपती हे त्याचे दैवत. त्याच्या दैवताला दया आली. दैवत प्रसन्न झाले आणि अक्ताला अभय दिले.
बल्लाळला पावलेला हा गणपती म्हणून बल्लाळेश्वर.
ह्याच देवळाच्या मागच्या बाजूला दुसरे एक देऊळ आहे. ते श्रीधुंडीविनायकाचे देऊळ म्हणून प्रख्यात आहे. श्रीधुंडीविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. पूर्वी बाळबल्लाळ हा रानात, एका गणपतीच्या मूर्तीच्या भजनपूजनात निमग्न असताना त्याचे पिताजी कल्याणशेटी तेथे आले. आणि त्यांनी त्याच्या पुढ्यातली मूर्ती उधळून लावली. जी मूर्ती उधळून लावली तीच ही मूर्ती होय. श्रीधुंडीविनायकाची कथा ही अशी आहे. दर्शन आणि पूजा अर्चा करताना, प्रथम ह्या श्रीधुंडीविनायकाला अग्रमान दिला जातो. आणि नंतर श्रीबल्लाळेश्वराचे दर्शन वगैरे, अशी प्रथा आहे.
पालीचा बल्लाळेश्वर । शमीतळीशिवकुमार
अज्ञभक्ताचा कैवार । तोच येईल सर्वदा ॥

सिद्धिविनायक | सिद्धटेक Siddhi Vinayak | Siddhatek अष्टविनायक दर्शन माहिती


भीमा नदीच्या काठचे सिद्धटेक हे अगदी जंगलभागात आहे. ते एक लहानसे कुग्राम आहे. तेथे जाण्यासाठी पक्की सडक नाही. जवलपास कुठे रेल्वेमार्गही नाही. ह्या गावात अजूनही बिजलीची सोय झालेली नसल्यामुळे कंदिलाच्या प्रकाशातच आपले सारे व्यवहार उरकावे लागतात.
श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर टेकडीवर उत्तराभिमुख असे आहे. वेशीपासून मंदिरापर्यंत सरदार हरिपंत फडके यांनी बांधलेला फरशीचा मार्ग आहे. मंदिरातील गाभारा पंधरा फूट लांबीचा आणि दहा फूट रुंदीचा असा आहे. देवाचे मखर पितळेच असूनदोन्ही बाजूला जयविजय उभे आहेत. मधला गाभारा इंदूरच्या अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे.
सिंहासन पाषाणाचे आहे. गाभाऱ्यातच देवाचे शेजघर आहे. बाहेरच्या बाजूला खुला सभामंडप आहे. पुढच्या बाजूला महाद्वार आणि त्यावर नगारखाना आहे. सकाळ, दुपार येथे चौघडा वाजत असतो. पेशवाईतले सरसेनापती हरिपंत फडके यांच्या स्मरणार्थ हा चौघडा वाजतो. त्यासाठी दरवर्षी सहाशे रुपयांचे वेतन कर्जतच्या ट्रेझरीतून दिले जाते. मंदिराच्या डाव्या बाजूला भीमा नदी ही दक्षिणेला वाह्ट असते. भीमानदीवर हरिपंत फडके यांनी घाट बांधला आहे. आणि तेथेच त्यांची समाधी आहे.
श्रीसिद्धिविनायकाची तीन फूट उंचीची मूर्ती ही स्वयंभू आहे. रुंदी अडीच फूट आहे. मूर्तीचे तोंड उत्तर दिशेला आहे.मूर्तीची सोंड ही उजव्या बाजूला वळलेली आहे. मांडी घातलेली आहे आणि मांडीवर ऋद्धिसिद्धि ह्या दोघी बसलेल्या आहेत. येथे देवाला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत बरीच रूढ आहे.
मंदिराच्या पश्चिम बाजूला श्रीशिवाई देवीचे आणि महादेवाचे देऊळ आहे. त्याच बाजूला श्री. काकासाहेब गाडगीळ यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ एक धर्मशाळा बांधलेली आहे.
प्राचीन काली मधु आणि कैटम अशा दोन राक्षसांनी सर्वांना अगदी त्राही भगवान करून सोडले होते. त्या दोन राक्षसांना निःपात करायला हवा होता. ते काम श्रीशंकराने शईविष्णूवर सोपविले. श्रीविष्णूने त्यासाठी श्रीगणेशाची सुद्धा उपासना करायला हवी होती. तशी उपासना करण्यासाठी एखाद्या सुयोग्य स्थळाची शोधाशोध करीत असताना श्रीविष्णु हा एका टेकडीवर येऊन पोचला. आणि त्या टेकडीवरच त्याने, ‘श्रीगणेशायनमः’ असा मंत्र म्हणत तपश्चर्या करावयाला आरंभ केला. श्रीविनायक विष्णुला प्रसन्न झाला आणि त्या दोन दैत्यांशी युद्ध करताना तुला विजय प्राप्त होईल असा अशिर्वाद त्याला दिला. श्रीविष्णूकडून त्या दैत्यांचा निःपात झाला. इथेच श्रीविष्णूला सिद्धी प्राप्त झाली. म्हणूनच ह्या स्थळाला सिद्धक्षेत्र अथवा सिद्धटेक हे नाव मिळाले. टेकडीवर देवालय उभारण्यात आले. आणि तेथे गंडकी शिलेची श्रीविनायकाची मूर्ती स्थापन करण्यात आली.
काही काळानंतर ते देवालय लुप्त झाले आणि तेथे टेकडीच उरली. त्या टेकडीवर गावातली गुरे चरण्यासाठी येऊ लागली. एक दिवस मोठा चमत्कार घडून आला. त्या टेकडीवर श्रीगजान प्रगट झालेले गुराख्यांना दिसून आले. मग काय ? गुराख्यांना फार आनंद झाला. ते गुराखी नित्यनेमाने भीमानदीवर स्नान करून बरोबर आनलेल्या शिदोरीचा त्या देवाला नैवेद्य दाखवू लागले.
नैवेद्य दाखवल्यानंतर मगच ते आपली कांदाभाकर खाऊ लागले. असा हा क्रम बरेच दिवस चालू होता. एक दिवस एका गुराख्याला दृष्टांत झाला. श्रीगजाननाने त्याला स्वप्नात येऊन सांगितलेकी, “गुराख्याने आज्ञा प्रमाण मानली. पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून तो त्या देवाची पूजाअर्चा घू लागल. त्याच्याकडूनच आरती आणि नैवेद्य करवून घेऊ लागला.
भीमानदीच्या काठी, महर्षी व्यासांनी मोठा यज्ञ केला होता. ते स्थान येथून जवळच आहे. नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे पडते त्यावेळी त्या यज्ञातील भस्म अजूनही दृष्टीस पडते.
शई सिद्धि विनायकाचे अत्यंत जागृत असे हे स्थान आहे.
सिद्धटेकी विनायक ।
सिद्धिदाता विघ्ननाशक ।
विष्णूही ज्याचा पूजक ।
त्यासि वंदन आदरे ॥

मोरेश्वर | मोरगाव Moreshwar | Morgaon अष्टविनायक दर्शन माहिती

ह्या देवळाच्या सभोवताली त्याच्या संरक्षणार्थ पक्का तट बांधण्यात आलेला आहे. जमिनीपासूण ह्या तटाची उंची जवळजवळ पन्नास फूट असावी. चार दिशेला चारी कोपऱ्यात मिनारासारखे चार स्तंभ उभे असलेले आढळतात.
मोरगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे, हे गाणप्य सांप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. ह्या पुण्यक्षेत्राबद्दल गणेशपुराणात बरीच महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. ह्या क्षेत्राचे प्राचीन नाव, ‘भूस्वानंदभुवन’. ह्या गावात मोरांबी वस्ती अगदी भरपूर आहे. म्हणूनच ह्या गावाला मोरगाव असे नाव पडले असावे. आणि मोरम्हणजे मयूर, म्हणून इथला देव मयुरेश्वर.
ह्या मंदिराचे तोंड उत्तरेकडे आहे. मंदिर उंचवट्यावर असल्यामुळे मंदिरात शिरण्यापूर्वी पायऱ्या चढाव्या लागतात. प्राकाराबाहेर पायऱ्या चढण्यापूर्वी नगारखाना आहे. आणि नगारखान्याच्या खालच्या बाजूला, आपल्या पुढल्या दोनपायांत लाडू धरलेला उंदीर उभा आहे. त्याच्यापुढे पंधरा फूट उंचीवर दगडी चौथऱ्यावर नंदी बसलेला आहे. त्या दगडी चौथऱ्यापुढे दहा-बारा फूट अंतरावर मुख्य मंदिर आहे. त्याचा प्राकार दुसऱ्या एका चौथऱ्यावर आहे. ह्या चौथऱ्यावर सभामंडप आहे आणि सभामंडपला लागून, पूर्वेकडे देवाचे शेजघर आहे. सभामंडपाचे पूर्वेला आवारामध्ये एक शमीचे आणि एक बिल्वदलाचे झाड आहे. पश्चिम दिशेला कल्पवृक्ष आहे. दर्शनाला आलेले भक्तजन याच वृक्षाला बसून अनुष्ठान करीत असतात.
मोरया गोसावी यांनी सुद्धा याच वृक्षाखाली तपश्चर्या केली.
तटाच्या आतल्या बाजूला चौकाच्या आठ कोपऱ्यांवर श्रीगणेशाच्या आठ प्रतिमा बसविलेल्या आहेत. तेवीस परिवार मूर्ती नवीन करून घेतलेल्या आहेत. आणि त्या मंदिरात सर्वत्र बसविलेल्या आहेत.
सभामंडपानंतर मुख्य गाभारा लागतो. गाभाऱ्यातील श्री मोरेश्वराची मूर्ती अत्यंत रमणीय आशी आहे. मूर्तीच्या डोळ्यांत आणि बेंबीमध्ये हिरे बसविलेले आहेत. मूर्तीच्या डोक्यावर नागाची फणा आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सिद्धी बुद्धीच्या मूर्ती उभ्या आहेत. त्या पितळेच्या आहेत. मोरेश्वराची मूर्ती भव्य आणि रेखीव अशी आहे.
असे म्हणतात की ही मूर्ती मूळची नव्हे. खरी मूर्ती रत्नांचा चुरा, लोह आणि माती यांनी बनलेलि असून ती दृश्य मूर्तीच्या मागच्या बाजूला ठेवण्यात आलेली आहे.
मूळ मूर्तीची स्थापना स्वतःअ ब्रह्मदेवानेच केली होती. पुढे पांडव तीर्थयात्रा करीत करीत येथे आले असताना त्यांनी मूळ मूर्तीला कुणाचा धक्का लागू नये म्हणून तिला तांब्याच्या पत्र्याने बंदिस्त करून ठेवली. आणि हल्लीची मूती नित्यपूजेसाठी स्थापन करण्यात आली.
मोरया गोसावी यांचा जन्म याच क्षेत्रात झाला. एक दिवस, ब्रह्मकमंडलू-तीर्थात स्नान करीत असताना त्यांना गणेशाची मूर्ती सापडली ह्या क्षेत्रामध्येच त्यांनी उग्र तपश्चर्या केली आणि सिद्धी प्राप्त करून घेतली. श्रीरावेशाच्या आज्ञेवरूनच आपल्याला कुंडात सापडलेली मूर्ती चिंचवड येथे नेली. आणि तेथे त्या मूर्तीची स्थापना केली. आणि चिंचवडला येऊन राहिले होते. तरीसुद्धा प्रत्येक शुद्ध चतुर्थीला ते मोरगावची वारी करायला कधीही चुकत नसत. शेवटी पवनाकाठी त्यांनी जिवंत समाधी घेतली.
ह्या मोरेश्वराविषयी, पुराणात काही माहिती दिलेली आहे.
कोणे एकेकाळी चक्रपाणी ह्या नावाचा एक राजा मिथिल देशात भंडकी नगरीत होऊन गेला. त्याला सिंधू नावाचा पुत्र झाला. त्या सिंधूने उग्र तपश्चर्या केली आणि सूर्यनारायणाकडून अमरपदाची प्राप्ती करून घ्तली. त्यामुळे तो उन्मत्त झाला. आणि त्याने सर्व देवांना जिंकले आणि त्यांना छळ आरंभला. सर्व देव एकत्र झाले आणि श्री विष्णूला शरण गेले. श्री विष्णूने त्या सिंधूशी युद्ध सुरू केले. परंतु त्या युद्धात विष्णूचा पराभव झाला. आणि त्यामुळे देवांचा छळ तसाच चालू राहिला. सर्व देव आता श्रीगजाननाला शरण गेले. श्रीगजाननाची त्यांनी प्रार्थना केली. श्रीगजाननाने पार्वतीच्या पोटी अवतार घेतला. आणि मोरावर बसून त्याने सिंधूशी युद्ध केले. युद्धात सिंधूचा वध केला. तेव्हापासून मोरगावच्या गजाननाचे नाव मयुरेश्वर आथवा मोरेश्वर असे पडले.
ज्याची इच्छा धरावी, ती गोष्ट हा मोरया देतो अशी याची ख्याती आहे.
मोरया मोरया मी बाळ तान्हे ।
तुझीच सेवा करु काय जाण ।
अन्याय माझे कोट्यानुकोटी ।
मोरेश्वरा बा तू घाल पोटी ॥
कऱ्हेचे तिरी एकसे मोरगावू ।
तिथे नांदतो मोरया जाण पाहू ।
चला जाऊ यात्रे महापुण्य आहे ।
मनी इच्छिले मोरया देत आहे ॥


खंडोबाची स्थाने Khandoba Places | Maharashtra अष्टविनायक दर्शन माहिती


सर्वसाधारपणे प्रत्येक घराण्यात पूर्वापार पद्धतीनुसार कुलदैवत, कुलस्वामिनी आणि कुलस्वामिनी व कुलदैवत हे कुटुंबाचे दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यानुसार कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका देवी, तुळजापूरची तुळजाभवानी इ. पैकी एक कुलस्वामिनी असते. तसेच ज्या कुटुंबामध्ये एक कुलस्वामी जसे खंडोबा हे दैवत असते.
कुलदैवत व कुलस्वामिनी हे त्या त्या घराण्याची भरभराट, समृद्धी, सुखशांती देणारे आणि संरक्षण करणारे आहेत ही त्यामागची भावना. या भावनेमधून प्रत्येक व्यक्तीमध्ये या देवतांच्याविषयी अढळ श्रद्धा दिसून येते. कुठल्याही आरंभलेल्या शुभकार्याचे यशाचे श्रेय हे या तिन्ही देवतांना दिले जाते व योग्यच आहे.
कर्ता करविता कुलस्वामीच आहे व व्यक्ती हे निमित्तमात्र आहे. ही भावना व्यक्तीच्या मनात दृढ असते. तेव्हा संकटकाळी तारणारा कुलस्वामी आहे. यातून बहुतेक कुटुंबात आणि व्यक्तीच्या श्रद्धेमुळे खंडोबाची उपासना केली जाते. यासाठी खंडोबा दैवताविषयी पौराणिक माहिती समजून घेणे आवश्यक आहे.
या कलीयुगात मनुष्याच्या हातून लहान-मोठी अनेक पापे कर्मे सदैव होत असतात. अशा पाप कर्मातून मणिमल्ल आणि मल्लासुर हे दोन दैत्य बृहदेवाच्या वराने उन्मत्त होऊन मृत्यू लोकातील ऋषिजनांना त्यांनी आरंभिलेल्या धार्मिक कार्यामध्ये विघ्ने आणून उपद्रव देऊ लागले, तेव्हा या दोन दैत्यांचा संहार करण्याचे दृष्टीने ब्रह्मदेव, विष्णू आणि इन्द्र हे भगवान शंकराकडे गेले आणि त्यांनी सांगितलेल्या निवेदनावरून हे दोन दैत्य ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचा दुरुपयोग करीत आहेत तेव्हा त्यांचा संहार करणेच योग्य आहे अशा भावनेतून श्री शिवशंकर क्रोधायमान झाले व त्यांनी जटा आपटून भयंकर अशा ध्रुतमारीची उत्पत्ती केली व स्वतः मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. तो दिवस चैत्री पौर्णिमेचा होता. त्यानंतर वीरभद्र, कार्तिकेय व महागणपती यांच्या अधिपत्यखाली त्यांच्या एकूण सातकोटी (येळकोट) शिवगणासह मार्तंड भैरव हे मणिमल्ल व मल्लासुर या दैत्यांचा नाश करण्यासाठी लढाईस तयार झाले. ह्या घनघोर लढाईत मार्गशीर्ष शु. प्रतिपदा ते षष्ठी या दिवशी मार्तंड भैरवाकडून हे दोन दैत्य मारले गेले. त्यामुळे षष्ठी या चंपाषष्ठी संबोधण्यात येऊ लागले व लोक मल्हारी मार्तंडाचे नवरात्र मार्गशीर्ष शु. प्रतिपदा ते मार्गशीर्ष शु. षष्ठी असे बसवू लागले. चैत्री पौर्णिमेस श्री भगवान शंकरानी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. त्यांचे वाहन नंदी असून मार्तंड भैरव यांना ४ हात असून त्यामध्ये खड्‌ग, डमरू, त्रिशूळ आणि पानमात्र असे त्यांनी धारण केलेले आहे. त्यांचे पायाशी मणिमल्ल आणि मल्लासूर यांची मुंडकी आहेत. त्यानंतर मगशीर्ष शु. ६ ( चंपाषष्ठी ) या दिवशी ते मल्हारी मार्तंड या नावाने जेजुरी जवळील कडेपठारावर प्रकट झाले. यास एक पौराणिक कथा आहे. ती अशी - मार्तंड भैरवाने मणीस जमिनीवर पाडले एवढ्यात मणी दैत्याने एक वर मगितला. ``माझे शीर तुझे पायाखाली नित्य असू दे आणि माझे अश्वारूढ रूपही तुझ्या सान्निध्यात राहू दे. ''तसेच मल्ल दैत्याला मार्तंड भैरवाने खाली पाडले तेव्हा मरण्यापूर्वी तोही मार्तंड भैरवाला म्हणाला ``देवा माझे नांव तुझ्या नावाचे आधी असावे'' मल्हारी म्हणजेच मल्ल अधिक अरी. दोघांच्या विनंतीस मार्तंड भैरवाने तथास्तु म्हटले.
मल्हारी मार्तंडाचा एक भक्त दर रविवारी कडेपठार येथे दर्शनासाठी जात असे. वयोमानानुसार मार्गाच्या अर्ध्या वाटेवर असलेल्या घोडे उड्डाणाच्या पुढे त्यास पुढे जाणे कठीण झाले. ही अवस्था पाहून मल्हारी मार्तंडाने त्या भक्तास दृष्टांत दिला की, तुला यापुढे माझे दर्शनासाठी एवढ्या लांबवर येण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी मीच तुझ्या दर्शनासाठी कडेपठार सोडून नवलाख पायऱ्या असलेल्या टेकडीवर सयंभू लिंग म्हणून प्रकट होत आहे. या ठिकाणालाच सध्याचे जेजुरी देवस्थान म्हणतात.

१२ ज्योर्तिर्लिंगे, अष्टविनायक, ११ मारुती, ३॥ देवीची पीठे, याचप्रमाणे महाराष्ट्रात ७ व कर्नाटकात ५ अशी खंडोबाची १२ तीर्थक्षेत्रे आहेत. महाराष्ट्रातील रहिवासी खंडोबा या नावाने व कर्नाटकातील रहिवासी श्री. मल्ल्या या नावाने ओळखतात.