Saturday, February 5, 2011

बल्लाळेश्वर | पाली Ballaleshwar | Pali अष्टविनायक दर्शन माहिती


श्रीबल्लाळेश्वराचे देऊळ फारच मनोहर आहे. त्याचे तोंड पूर्व दिशेला आहे. त्यामुळे सूर्वोदय होताच सूर्याची कोवळी सोनेरी किरणे बरोबर देवाच्या मूर्तीवर पडतात. त्यावेळी तिथले वातावरण अगदी पवित्र आणि प्रसन्न असे एखाद्या नास्तिकालाही वाटते. मंदिराचे बांधकाम अगदी चिरेबंदी आहे. शिशाचा रस ओतून भिंती अगदी मजबूत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे बांधकाम एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणेच झालेले आहे.
मंदिराचा मुख्य गाभारा पंधरा फूट उंच आहे. तो उंदीर गणपतीकडे पहाणारा आहे. मंदिराबाहेरच्चा सभामंडप चाळीस फूट लांबीचा आणि वीस पूट रुंदीचा आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये नक्षीकाम केलेले अगदी मखर आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला दोन तलाव आहेत. त्यावर घाट बांधलेले आहेत. तलाव सदोदित पाण्याने भरलेले असतात. परंतु तलावातले पाणी मात्र स्वच्छ नाही आणि पिण्याजोगे तर बिलकूल नाही. बाहेरच्या कमानीत एक मोठी थोरली घंटा आहे. ती पाहिल्यावर नाशिकच्या नारोशंकरी घंटेची आठवण होते. ही घंटा चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईचा किल्ला जिंकला त्यावेळी जी लुटालुट झाली, त्यात मिळाली आणि ती मग पेशव्यांनी ह्या देवस्थानाला अर्पण केली असे म्हणतात.
मोरोबा दादा फडणीस यांचे वडील बाबुराव फडणीस यांनी हे देवालय बांधले आणि त्यासाठी नेमणूक करून दिली. त्याचवेळी त्यांनी धर्मशाळा आणि मठही बांधला.
जागृत देवस्थान म्हणून ह्या देवस्थानाची फार ख्याती आहे. जुन्या काळू ह्या देवालानवसाचे आततायी प्रकार केले जात असे म्हणतात. त्या प्रकारापैकी आपली जाभ कापून देवाला अर्पण करण्याचा एक प्रकार होता.
अशी एक घटना १७४४/४५ साली पडल्याची नोंद इतिहासात सापडते. ती खबर केली आणि मंदिराची शुद्धि करून घेतली.
१७५३/५४ साली खुद्द पेशव्यांनी श्रीबल्लाळेश्वरावर अभिषेक केला व अनुष्ठान करविले. ह्याबाबत ऐतिहासिक पेशवे दप्तरात एक नोंद आढळून येते.
गाभाऱ्यात श्रीबल्लाळ विनायकाची मूर्ती आहे. तिची उंची तीन फूट आहे. कपाळाचा भाग खोलगट तर बाकीचा चेहरा स्पष्ट असा आहे. सोंड डावीकडे वळलेली आहे. बेंबीमध्ये आणि डोळ्यांमध्ये दैदिप्यमान हिरे बसविलेले आहेत. देवाची मूर्ती दगडी सिंहासनावर विराजमान झालेली आहे. सिंहासन मूर्तीच्या सभोवती जडविलेले आहे. मूर्तीच्या बेंबीपासूनचा भाग सिंहासनाच्यावर दिसून येतो. देवाच्या जवळ ऋद्धिसिद्धि उभ्या आहेत.
कृपयुगामध्ये पल्लीपूर ह्या नगरात, कल्याणशेट ह्या नावाचा एक व्यापारी रहात असे. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. पोटी मूलबाळ नसल्यमुळे इंदुमतीने श्रीगणपतीची उपासना सुरू केली. काहीकाळाने, तिला दिवस गेले. आणि तिला मुलगा झाला.
त्या आपल्या मुलाचे नाव तिने ‘बल्लाळ’ ठेवले. बल्लाळ लहानाचा मोठा होऊ लागला. परंतु त्याला श्रीगणपतीच्या चिंतनावाचून दुसरे काहीच सूचत नव्हते. रात्रंदिवस तॊ आपल्या देवाचे चिंतन करीत राहिला. त्याच्या संगतीत राहिलेली गावातली मुलेही श्रीगणपतीची उपासना करू लागली. ती मुलेसुद्धा सदोदित गणपतीचे चिंतन करीत राहिली. मग काय? बल्लळाची संगत धरल्यामुळे गावातील मुले बिघडून गेली अशी ओरड सुरू झाली. त्या मुलांच्या पलकांनी बल्लाळच्या पित्याजवळ आपली तक्रार निवेदन केली. कल्याणशेटी आपल्या मुलाला रागे भरला. त्याने बल्लाळच्या पुढ्यातली मूर्ती उथळून टाकली आणि त्याला भरपूर मार दिला. “तू असा वेडेपणा करू नकोस आणि गावातल्या मुलांना बिघडवू नकोस” असाही त्याला दम दिला.
बेदम मार खाल्ल्यामुळे, बल्लाळ बेशुद्ध झाला. श्रीगणपती हे त्याचे दैवत. त्याच्या दैवताला दया आली. दैवत प्रसन्न झाले आणि अक्ताला अभय दिले.
बल्लाळला पावलेला हा गणपती म्हणून बल्लाळेश्वर.
ह्याच देवळाच्या मागच्या बाजूला दुसरे एक देऊळ आहे. ते श्रीधुंडीविनायकाचे देऊळ म्हणून प्रख्यात आहे. श्रीधुंडीविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. पूर्वी बाळबल्लाळ हा रानात, एका गणपतीच्या मूर्तीच्या भजनपूजनात निमग्न असताना त्याचे पिताजी कल्याणशेटी तेथे आले. आणि त्यांनी त्याच्या पुढ्यातली मूर्ती उधळून लावली. जी मूर्ती उधळून लावली तीच ही मूर्ती होय. श्रीधुंडीविनायकाची कथा ही अशी आहे. दर्शन आणि पूजा अर्चा करताना, प्रथम ह्या श्रीधुंडीविनायकाला अग्रमान दिला जातो. आणि नंतर श्रीबल्लाळेश्वराचे दर्शन वगैरे, अशी प्रथा आहे.
पालीचा बल्लाळेश्वर । शमीतळीशिवकुमार
अज्ञभक्ताचा कैवार । तोच येईल सर्वदा ॥

No comments:

Post a Comment