Saturday, February 5, 2011

विघ्नेश्वर | ओझर Vighneshwar | Ozar अष्टविनायक दर्शन माहिती


जुन्नरला जाताना सुमारे चार फर्लांगावर उजव्या बाजूस ओझर गावाकडे जायला फाटा फुटतो. देवस्थानाकडे जयला कुकडी नदी पार करून जावे लागते.
श्री विघ्नेश्वराचे देवालय पूर्व दिशेकडे तोंड करून उभे आहे. देवालय चारही बाजूंनी दगडी तटाने बंदिस्त करून टाकलेले आहे. ह्या दगडी तटावरून चालण्यासाठी पायवाटही आहे.
देवाच्या मूर्तीसमोर दहा फुटी ऐसपैस मंडप आहे. मंडपाच्या दारातून बाहेर पडले की काळ्या पाषाणाला उंदीर आहे. ह्या मंडपाला लागूनच दुसरा ऐसपैस असा सभामंडप आहे. त्यापुढे आणखीन एक दहा फुटाचा सभामंडप आहे. त्याच्यापुढे दगडी फरशीचे विस्तृत पटांगण आहे. ह्या पटांगणात दोन दीपमाळा उभ्या आहेत.
देवळाचा चुमट मोठा कलाकुसरीचा आहे. त्यावर शिखर आणि सोनेरी कळस आहे.
देवालयाचा परिसर फारच रमणीय आहे. देवालयाच्या मंदिरावरील शिखर चिमाजी अप्पांनी बांधले. वसईचा किल्ला जिंकून परत येत असतानाच, चिमाजी अप्पांनीह्या देवालयाचा जीर्णोद्धार करविला.
श्रीमंत बाजीराव पेशवे हे देखील ह या विघ्नेश्वराचे महान भक्त होते. ह्या विघ्नेश्वरासंबंधी जी कथा सांगतात ती अशी -
एकदा इंद्राचा दरबार चालू असताना, तेथे नारदमुनीची स्वारी प्रगट झाली. त्यानी इंद्राला असे निवेदन केली की, “हिमालयावर अभिनंदन नावाच्या राजाने यज्ञसंभारभ मांडला आहे. त्या यज्ञात अभिनंदनाने, तुझा हविर्भाग तुला देऊ केला नाही. आणि अशाप्रकारे त्याने तुझा अपमान केलाआहे. हा असा अपमान तू का सहन करावास?” अपमान झाल्याचे कळताच इंद्र खूप संतापला. काळ नावाच्या राक्षसाला विघ्नासूर असे नाव इंद्राने दिले. आणि त्याच्याकडून त्या राजाच्या यज्ञाला विघ्न आणले. साऱ्या देवांमध्ये घबराट पसरला. सर्व देवांनी श्रीगणपतीची प्रार्थना केली.
श्रीगणपती पार्श्व ऋषींचा पुत्र बनला आणि त्याने विघ्नासुराशी युद्ध आरंभले. त्या युद्धात गणपतीने विघ्नासुराचा पाडाव केला. विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गनपतीने त्याला अभय दिले.आणि त्याच्याच विनंतीवरून गणपतीने, ‘विघ्नेश्वर’ हे नाव धारण केले. देवांनी भाद्रपद शुद्ध ४ ला, ओझरगावी गणपतीची स्थापना केली. तेव्हापासूनच ह्या देवाचे नाव विघ्नेश्वर असे पडले.
ह्या देवालयातील विघ्नेश्वराची मूर्ती पूर्णाकृती आहे. देवाने मांडी घातलेली आहे. सोंड डावीकडे आहे. डोळ्यांत दोन माणके बसविली आहेत. कपाळावर हिरा बसविला आहे. आणि बेंबीत खडा आहे.
ओझरगावी विघ्नेश्वर । जये मारिला विघ्नासूर
तो मी नमिला रूपसुंदर । पिगलाक्ष गजानन ॥

No comments:

Post a Comment