Saturday, February 5, 2011

महागणपति | रांजणगाव Mahaganapati | Ranjangaon अष्टविनायक दर्शन माहिती


पुणे अहमदनगर मार्गावर, पुणे जिल्ह्यात, शिरूर तालुक्यात रांजणगाव आहे. इथले देवालय पूर्वेकडे तोंड करून उभे आहे. ह्या देवालयाची रचना अशी केलेली आहे की, उत्तरायन अथवा दक्षिणायन याच्या मध्यकालात, सूर्याचे किरण नेमके ह्या देवाच्या मूर्तीवरच पडत असतात.
देवालयातील सभामंडप इंदोरचे सरदार किबे यांनी बांधलेला आहे. पेशव्यांच्या पदरी असलेले सरदार पवार आणि सरदार शिंदे यांनी येथील ओवऱ्या बांधलेल्या आहेत. देवालयाच्या आतीलमूर्तीचा गाभारा आणि बाहेरील गाभारा श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी बांधलेला आहे.
देवालयाटील पूजामूर्तीच्या खाली तळघरात एक लहानशी मूर्ती आहे. तीच खरी श्रीची मूर्ती आणि मूळं मूर्ती. परधर्मीयांच्या हल्ल्याच्या भीतीमुळे, मूळ मूर्ती अशा प्रकारे लपवून ठेवण्यात आल्याचे सांगतात. त्या मूर्तीला दहा सोंडा आणि वीस हात आहेत असे म्हणतात. ती मूर्ती अगदी क्वचित्‌ प्रसंगीच बाहेर काढण्यात येते. या मूर्तीचे ध्यानाला. “महागणपतीचे ध्यान” म्हणतात. “महोत्कट” असे ह्या गणपतीचे नाव आहे. असे सांगतात की अशाच ध्यानाची दुसरी एक मूर्ती, पेशवाईतील प्रसिद्ध कारभारी हरिपंत तात्या फडके यांच्या वंशजाकडे त्यांच्या पुण्याच्या वाड्यात ठेवलेली आहे.
ह्या देवालयाच्या नजीकच अशी एक विहीर आहे की, त्या विहिरीचे पाणी दुष्काळतही कधी आटत नाही.
देवालयातील महागणप्ती हा डाव्या सोंडेचा आहे. देवाने मांडी घातली आहे. मूर्ती मनोहर आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला ऋद्धिसिद्धि ह्या दोघी उभ्या आहेत.
कथा अशी -
श्रीगणपति एकदा प्रसन्न झाला आणि त्याने त्रिपुरासुराला वर दिला. पण त्यामुळे तो असुर मस्त बनला आणि त्याने चहूबाजूला पुंडाई करायला सुरवात केली. देवांचा राजा इंद्र याला ढवलून ती स्वतःच त्या इंद्राच्या सिंहासनावर बसला. कैलासावर बसलेल्या श्रीशंकराला त्याने सळो की पळो करून सोडले. सगळीकडे असुरांचाच वरचष्म. देवांना कुणीच विचारीना जीवन अगदी असह्य होऊन गेले. श्रीशंकराला बरोबर घेऊन सर्व देव श्रीगणपतीला शरण गेले. गणपतीची आराधना करण्यासाठी नारदांनी आठ श्लोकांची गणेशस्तुती देवांना सांगितली. नारदकृत संकटनाशक स्तोत्र ते हेच!
“प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुः कामार्थसिद्धये ॥”
श्रीगणपति प्रसन्न झला. त्याने वर दिला.
देव-दैत्यांचे घनघोर युद्ध झाले.
त्या युद्धात त्रिपुरासुर मारला गेला.
दैत्यसैन्याचा पुरा निःपात झाला.
सर्वत्र आनंदी आनंद झाला.
मणिपूर नावाचे गाव वसविले. तेच आजचे रांजणगाव.
रांजणगावी गणपती । यशद झाला पित्याप्रती ॥
त्रिपुराची करी समाप्ती । शिव ज्याच्या प्रभावे ॥
महाराष्ट्री अष्टविनायक । त्याचे पायी नतमस्तक
होऊनिया ग्रंथलेखक । देशभाषा बोलतो ॥

No comments:

Post a Comment